पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. पुण्यात हत्या, मारहाण, विनयभंग आणि अत्याचारांच्या घटना घडत आहेत. अशामध्ये पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने पैसे परत न दिल्यामुळे एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जबर मारहाण करत असल्याचे दिसत आहे. उसने पैसे न दिल्यामुळे या व्यक्तीला जबर मराहाण करण्यात आला. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. मोहम्मद जुबेर इकबाल मेमन असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहम्मद यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमजान, अमीर काझी, अब्दुल्ला शेख आणि दोन अनोळखी व्यक्ती अशा ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.