Two Sister Physically Abused In Pune 
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरलं! दोन दिवस घरात डांबलं, २ अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार

Two Sister Physically Abused In Pune: घरात डांबून ठेवत २ अल्पवयीन आरोपींनी दोन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संतापजनक घटना घडलीय. येथील दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर अत्याचार झालाय. अत्याचार करणारेदेखील अल्पवयीन असून ते जवळील नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे. अत्याचार करणाऱ्यांनी दोन्ही बहिणींना दोन दिवस घरात डांबून ठेवलं होतं.

जवळच्या नातेवाईकांकडूनच दोन बहिणींवर दोन दिवस अत्याचार केल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

शिपायाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

सोलापूरमधील नामांकित शाळेमध्ये एका शिपायाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केलाय. याप्रकरणी या शिपायाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या शिपायाने शाळेच्या परिसरातील बाथरुममध्ये नेऊन या मुलीचा लैंगिक छळ केल्याचं सांगण्यात येत आहे. ५५ वर्षीय शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फ्रान्सिस आशिष पिंटो असं या आरोपी शिपायाचे नाव आहे.

नाशिकमध्ये अल्पवीयन मुलीवर बलात्कार

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना नाशिकमधील ओझर येथे घडलीय. नराधमाने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ओझर पोलीस ठाणे येथे फिर्यादीने फिर्याद दिली आहे. यानुसार शिरसगाव चौकी ओझर शिवार येथे फिर्यादी यांच्या घरी एका अल्पवयीन पीडित मुलीवर एका अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केलाय. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संबंधीत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT