Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: चित्तथरारक! मुझे तुम्हारा खून पीना है...; मित्राची अघोरी इच्छा, झोपेतच दगडाने ठेचून केली हत्या

Crime News: इस्तियाक आणि राहुल लोहार हे दोघे मित्र गुरुवारी रात्री मोशी परिसरामध्ये दारू पार्टी करत होते.

गोपाल मोटघरे

Pune News: पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात मित्राकडे अघोरी इच्छा व्यक्त केल्याने, संतापलेल्या मित्राने त्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात भीम ज्योती मंडळ संजय गांधी नगर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेतील इस्तियाक खान असे मृत तरुणाचे नाव आहे. इस्तियाक आणि राहुल लोहार हे दोघे मित्र गुरुवारी रात्री मोशी परिसरामध्ये दारू पार्टी करत होते.

या पार्टीदरम्यान दोघांमध्येही मोठा वाद झाला. इस्तीयाक खान याने राहुल लोहार याला मला तुझं रक्त प्यायचं आहे. अशी अघोरी मागणी केली होती. या मागणीसाठी इस्तीयाक खान याने राहुल लोहारच्या मानेला आपल्या दातांनी चावा देखील घेतला होता. याचाच बदला घेण्याच्या हेतुने राहुल लोहारने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तीयाक खानच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे.

इस्तीयाक खानने राहुलच्या मानेचा चावा घेतला होता तेव्हा राहुलने स्वतःची कशीबशी सुटका करून पळ काढला. मात्र त्यांनतर काही वेळाने इस्तीयाक खान आणि त्याचा मित्र विशाल कांबळे हा एका ओट्यावर झोपला होता.

राहुल लोहार तिथं पोहचला अन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तीयाक खानच्या डोक्यात त्याने दगड घातला. यात इस्तीयाक खान याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात भोसरी एमआयडीसी पोलिसांनी राहुल लोहार विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, मोठा नेता उपमुख्यमंत्र्यांच्या गटात जाण्याच्या तयारीत

'तू खूप क्यूट आहेस' म्हणाला अन्...; स्कूल बसचालकाचं 9 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य|VIDEO

Chanakya Niti : चाणक्यांच्या या ३ गोष्टी समजून घ्या, संसार कधीच मोडणार नाही

Pune Airport : बँकॉक वरून आलेल्या प्रवासीकडून ६ कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: मीरा रोडच्या केम छो बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT