Darshana Pawar Murder Case Updates Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar Death Case: दर्शना पवार हत्या प्रकरण! खूनात वापरलेले कटर आणि दुचाकी पोलिसांकडून जप्त; राहुल हांडोरच्या पोलीस कोठडीत वाढ

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील दर्शना पवार (Darshana Pawar Death) हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होत आहेत. लग्नाला नकार दिल्यामुळे एमपीएससी पास दर्शनाची मित्रानेच निर्घृण हत्या केली होती.

या हत्येतील मुख्य आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore) सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्या माहितेच्या आधारे पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले कटर आणि बाईक जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एमपीएससी पास दर्शना पवारची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. १८ जून रोजी दर्शना हिचा राजगडच्या (Rajgad Fort) पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ज्यानंतर पोलिस तपासात राहुल हांडोरे या मित्रानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला २१ जून रोजी मुंबईत (Mumbai) अटक करण्यात आली होती.

ती राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. यावेळी विवाहास नकार दिल्याने दर्शनावर कंपासमधील कटरने तीन ते चार वेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली राहुलने नुकतीच पोलिसांना दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपी राहुल हांडोरे याच्याकडून जप्त केले आहे.

राहुल आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपी राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यत वाढ करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT