Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: धक्कादायक! तारण ठेवलेला लॅपटॉप मागितल्याने दांम्पत्याला बेदम मारहाण; दोघांना अटक

Pune Latest News: आरोपींनी चाकूने धमकावत दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: तारण ठेवलेला लॅपटॉप परत मागितल्याच्या कारणातून दोघांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी संजय कारभारी शिंदे (वय ३१ ) आणि शंकर हरीदास साबळे (वय २०, रा. दोघेही चंदननगर) या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे..

पुणे शहरातील (Pune) गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खंडणी, मारामाऱ्या असे प्रकार शहरात वाढताना दिसत असून असाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये दोघांनी दांम्तप्याला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत एका २४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेचा पती रोशन उसाकोयल याने संजय कारभारी शिंदे यांच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्याबदल्यात लॅपटॉप त्याच्याकडे तारण म्हणून दिला होता. १७ मे रोजी हे दांम्पत्य संजयकडे लॅपटॉप मागण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्यामुळे त्याने रोशनला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. (Latest Marathi News)

भांडणात मध्यस्थी करताना शस्त्राचा वार महिलेच्या दंडाला लागला. त्यानंतर आरोपी शंकरने चाकूने दाम्पत्याला धमकावून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत. (Pune Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

SCROLL FOR NEXT