Scene of crime: Businessman shot dead by friend in Pimpri-Chinchwad’s Alankapuram area; police investigating the case. 
मुंबई/पुणे

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Pune Crime Businessman Shot Dead: पिंपरी-चिंचवडमधील अलंकापुरम परिसरात एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आलीय. दिवसाढवळ्या हा गोळीबार झाला असून दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • पिंपरी चिंचवडमधील अलंकापूरम रस्त्यावर एका व्यावसायिकाची हत्या झाली.

  • दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

  • मृत व्यक्ती आणि त्याच्या मित्रांमध्ये काही दिवसापूर्वी वाद झाले होते.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढू लागलीय. एक आठवड्यापूर्वीच पुण्यातील सासवड रोडवर गॅगवॉर झाला होता. ही घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडलीय. पिंपरी चिंचवड येथील अलंकापुरम रस्त्यावर एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या झालीय. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे ही घटना घडली.

नितीन शंकर गिलबिले, असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले, वडमुखवाडी, चऱ्होली येथील राहणारा होता. नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते. त्यावेळी त्याचे अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फाॅर्च्यूनर कार घेऊन तेथे आले.

त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवले. त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने ते गेले. त्यानंतर त्यांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली. यात नितीन यांचा मृत्यू झाला. दरम्यान अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर हे संशयित आरोपी आहेत.

अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर आणि नितीन गिलबिले यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झाला होता. त्याच वादातून नितीन गिलबिले यांच्यावर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी हल्ला केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नितीन गिलबिले यांचा खून का झाला याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाहीये. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नितीन गिलबिले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर नितीन गिलबिले यांनी हॉटेल सुरू केले होते. तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडेतत्त्वावरही दिले होते, त्यासह ते जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील ते करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT