पिंपरी-चिंचवडमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण.
अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद.
पोलिसांनी ५० किलोमीटर पाठलाग करून व्यापाऱ्याची सुटका केली.
गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाराचे अपहरण करण्यात आलं होतं. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपींचे 50 किलोमीटर पाठलाग करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे. तसेच अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत काल संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान एका चार चाकी वाहनामध्ये पाच जणांनी एका व्यापाऱ्यांच अपहरण केलं होतं. अपहरण करत असल्याची घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, एका कार जवळ चार ते पाच जण उभे आहेत. त्यावेळी एक व्यक्ती स्कुटी घेऊन तेथे येतो.
टोळक्यापैकी एकजण स्कुटी थांबवतो. त्यांना स्कूट बाजुला घ्यायला सांगत असल्याचं दिसतं. त्यानंतर स्कुटीवरील व्यक्ती आपली दुचाकी माघारी वळवतो. तेव्हा टोळ्यामधील एकजण धावत जाऊन त्यांना खाली पाडतो. मग टोळीतील सर्वजण व्यापाऱ्याला उचलून कारमध्ये कोंबतात. त्यावेळी व्यापारी वाचवा, वाचवा असा आराडाओरड करतो. व्यापाऱ्याचा आराडाओरड ऐकून तेथे अनेकजण जमतात. परंतु ते कोणीच त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावत नाही. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरणकर्त्यांना पकडून व्यापाऱ्याची सुटका केली.
अपहरण केल्यानंतर आरोपी हे नाशिक फाटा मार्गे नाशिक कडे जायला निघाले होते. याची माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना मिळताच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांच्या मदतीने संगमनेर टोल नाक्यावर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून दोन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे आणि एक चार चाकी वाहन असा 18 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.