Pune Khed Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात धक्कादायक घटना! हात बांधलेले अन् मृतदेह झाडाला लटकलेला; लष्कराच्या जवानासोबत नेमकं झालं काय?

Latest Pune crime news : पुण्यात लष्करातील सुभेदाराचा हात बांधलेल्या अवस्थेत गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

भारतीय लष्करातील सुभेदार सिद्धेश भोसले यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह लटकलेल्या स्थितीत असताना त्यांचे हातही बांधलेले होते. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबतचे गूढ वाढले आहे. सुभेदार सिद्धेश भोसले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक्स खेळाडू होते आणि त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनामुळे लष्करी दलासह पुणे शहरावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

बुधवारी सकाळी पुणे-आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती, कुसमाडे कॉलनी येथील घराबाहेरील एका झाडाला सुभेदार भोसले यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. त्यांच्या गळ्याभोवती पाण्याचा पाईप होता आणि त्याच पाईपने त्यांचे हातही बांधलेले होते. या विचित्र परिस्थितीमुळे पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. भोसले रात्री घरातून बाहेर कसे पडले आणि त्यांच्यासोबत नेमके काय घडले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पोलीस उपआयुक्त (झोन ४) चिलुमुला रजनीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी या प्रकरणी 'अकस्मात मृत्यू'ची (ADR) नोंद करण्यात आली आहे.

लष्कराच्या माहिती विभागानुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या १० व्या 'ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई चॅम्पियनशिप'मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात सिद्धेश भोसले यांचा समावेश होता. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांना सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती.

डीसीपी रजनीकांत यांनी सांगितले की, शवविच्छेदन (Post-mortem) अहवालात मृत्यूचे कारण 'गळफास' असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, "स्वतःचे हात बांधून गळफास घेणे शक्य आहे का?" हा तांत्रिक प्रश्न पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस भोसले यांची आर्थिक परिस्थिती, कामाच्या ठिकाणचा ताण किंवा अन्य काही कौटुंबिक समस्या होत्या का, याचा तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ते तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे.

सिद्धेश भोसले हे 'बॉम्बे सॅपर्स'च्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये होते आणि सध्या 'कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग' (CME) येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. भोसले हे बॉम्बे सॅपर्सच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये होते. सध्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग येथे कार्यकरत होते. भोसले हे प्रशिक्षणासाठी बंगळूरु येथील लष्कराच्या ॲक्रोबॅटिक नोडमध्ये होते. भोसले क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट होते आणि त्यामुळेच त्यांना सुभेदार पदावर बढती देण्यात आली, अशी माहिती लष्करातील एका सूत्राने TOI ला दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT