Pune Crime Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पैसे उधार न दिल्याने दुकानात घातला होता राडा; पोलिसांनी भरचौकातून काढली धिंड!

पैसे उधार दिले नाही म्हणून दुकानात घुसून दुकान तोडफोड केल्याचा प्रकार घडला शहरात काही दिवसांपूर्वी घडला होता...

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. काही शहरातील सदाशिव पेठ परिसरात भरचौकात तरुणीवर कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पोलिसही अलर्ट मोडवर आले आहेत.

काही दिवसांपुर्वीच पुण्यातील चंदननगर भागात कपडे दुकानदार मालकावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्लोखोर आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईने पोलिसांनी गुन्हेगारांना एकप्रकारे इशारा दिला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे चंदननगर परिसरात साईनाथनगर येथे अंजली कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपी ओमकार खुपसुगे हा दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पैसे उधार न दिल्याने राडा घातला होता.

आरोपी त्याच्या इतर दोन साथीदारांना घेऊन आला आणि कोयत्याने दुकानाची बाहेरील दरवाजाची काच फोडली तसेच दुकानाच्याही काचा फोडल्या. या प्रकारामुळे आजबाजुस असलेल्या दुकानदारानी घाबरून दुकाने बंद केली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Pune Crime News)

या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी संकेत कमलाकर खोत, ओमकार रिआप्पा खुपसू, मंगेश गणेश मोरे, गणेश गौतम कोरडे यांना अटक केली. या घटनेचा तात्काळ तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांची धिंड काढली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT