Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

Pune Crime News : पुण्यात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीचा घरमालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुण्यातील तरुणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याचा आरोप

  • १२ डिसेंबरच्या रात्री पार्टीहून परतताना प्रकार घडला

  • घरमालकावर पोलिसांत गुन्हा दाखल

  • घटनेनंतर परिसरात तणाव व भीतीचे वातावरण

  • पुण्यातील तरुणींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित

पुणे हे विद्येचे माहेर घर आहे. या शहरात अनेक मैल पार करून विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी येतात. मात्र याच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीजी मध्ये राहणाऱ्या तरुणीचा घरमालकाने विनयभंग केला असल्याची घटना घडली.हा प्रकार १२ डिसेंबरच्या रात्री पार्टीहून परतताना घडला असून तरुणीच्या फिर्यादीवरून घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय तरुणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात जॉब करते. १२ डिसेंबरच्या रात्री तरुणी तिच्या मित्र मैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती. पार्टीत या तरुणीने मद्य प्राशन केले होते. दारु जास्त झाल्याने तिला चालता येत नव्हते. तरुणी नशेत असल्याने तिला तिच्या मित्र मैत्रिणींनी हॉस्टेलच्या पायऱ्यांवर सोडले.

दारू जास्त झालेल्या तरुणीवर घरमालकाची वाईट नजर पडली. त्यानंतर तरुणीच्या घरमालकाने तिला बसलेली बघून मागून येऊन मिठी मारली आणि अंगाला नको तो स्पर्श करत तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी तरुणीने तडक पोलीस ठाणे गाठत घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक साळवे तपास करीत आहेत. दरम्यान पुण्यासारख्या उच्चशिक्षित शहरात मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT