Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणे हादरलं! चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या; ५ जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यात कबुतर चोरीच्या संशयावरून १९ वर्षीय रूपेश शिंदे याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या

  • रूपेश शिंदे (१९) याचा मारहाणीत मृत्यू

  • पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

  • हडपसर परिसरात घटना घडली

  • पोलिसांकडून तपास सुरू

सचिन जाधव, पुणे

Pune Rupesh Shinde Murder News पुण्यातून क्षुल्लक कारणावरून कोयत्याने हल्ला, प्रेम संबंधातून तरुणाची हत्या अशा घटना सतत समोर येत असताना आता चोरीच्या संशयातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. कबुतर चोरीच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,रूपेश धनराज शिंदे (वय १९) असे मृत मुलाचे नाव आहे. हत्येच्या दिवशी त्याच्यासोबत त्याचा मित्र अजय गणेश टिंगरे (वय २०) हा होता. १८ मार्च रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास रूपेश आणि अजय हे दुचाकीवरून मोशीकडे जात होते. हडपसर येथील शंकरमठाजवळ ते रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यानंतर पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोर कॅनाललगत असलेल्या मोकळ्या जागेत कबुतरांच्या पिंजऱ्याजवळ गेले.

त्यावेळी श्वानांचा आवाज आल्याने ते दोघे तेथून पळू लागले. यावेळी स्थानिक पाच जणांनी चोरीच्या संशयावरून त्यांचा पाठलाग केला. मुख्य रस्त्यावरील जिनमाता मोटर्ससमोर रूपेश शिंदे पळताना खाली पडला. त्यानंतर टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुपेश याचे वडील धनराज बळिराम शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वानवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: PNG कनेक्शन लगेच मिळणार, केंद्र सरकारचे राज्यांच्या यंत्रणांना आदेश

Homemade Mojito Recipe: कडक उन्हाळ्यात घरीच बनवा मोजितो, सोपी आहे रेसिपी

गुढीपाडव्याच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

Satara : गर्भपातानंतर बाळ जिवंत जन्मलं, १२ तास उपाशी ठेवल्यानं मृत्यूचा आरोप; मातेसह कुटुंबीयांची हायकोर्टात याचिका

Tumbbadchi Manjula: हे डोळे कुणाचे..? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तुंबाडची मंजुळा'

SCROLL FOR NEXT