Nagpur Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Lonavala Crime: धक्कादायक! लोणावळा शहरात १० घरफोड्या उघडकीस; मुद्देमालासह आरोपींना अटक

Lonavala News Update: पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरामध्ये चोरी होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिलीप कांबळे

Lonavla Crime News:

लोणावळा शहरात नऊ घरफोड्यांचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. लोणावळा शहरात नऊ व ग्रामीण भागात एक अशा दहा घरफोड्या उघडकिस आल्या असून मुद्देमालासह आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा (Lonavala) परिसरातील पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरात शिरुन घरफोडी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात मुद्देमालांसह आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वसीम चौधरी, सलीम चौधरी आणि शहारूख बाबू शेख असे सराईत आरोपींची नावे आहे.

या आरोपींकडून एक तोळा सोन्याची चेन ,सोन्याच्या दोन अंगट्या, दोन डायमंडच्या अंगठया, एक सोन्याची अंगठी, दोन मोटार सायकल, रोख रक्कम असा एकूण दोन लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे..

लोणावळा परीसर हे थंड हवेचे ठिकाण असल्याने परीसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी व राहण्यासाठी येतात. काही पर्यटकांचे स्वतःची घरे आहेत तर काही पर्यटक भाडेतत्वावर घरे घेवून राहतात. पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरामध्ये चोरी होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT