Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे शहराची डिजिटल क्षेत्रात प्रगती; नव्या सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन

Pune News: या प्रदर्शनात पुणे शहराची डिजिटल क्षेत्रातील प्रगती प्रदर्शनातून समोर आली.

साम टिव्ही ब्युरो

Pune News: जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे. डब्ल्यू. मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला परदेशी प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या प्रदर्शनात पुणे शहराची डिजिटल क्षेत्रातील प्रगती प्रदर्शनातून समोर आली. (Latest Marathi News)

प्रदर्शनातून भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन

भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पाहून बैठकीसाठी उपस्थित परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले. या प्रदर्शनात आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणालीची माहिती परदेशी प्रतिनिधींनी घेतली.

'सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीट प्लॅटफॉर्म बाबत माहितीपूर्ण दालनांतून या प्रकल्पांचीही माहिती प्रतिनिधींनी उत्सुकतेने घेतली. यामध्ये डिजिटल इंडिया जर्नी हा सिम्युलेटरद्वारे भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी अनुभव दर्शविणारे साधनही आकर्षण ठरले आहे.

‘आधार’बाबत जाणून घेतले

भारत सरकारने राबविलेल्या आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती सर्वांनी बारकाईने जाणून घेतली. जगातील हा एक मोठा आणि यशस्वी उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. आधार ओळख प्रणालीच्या सहाय्याने जगातील सर्वाधिक बँक खाती भारतात काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आधार क्रमांकाचा, ई- केवायसी चा उपयोग करुन थेट लाभ हस्तांतरण, अर्थसहाय्याचे थेट बॅंक खात्यात हस्तांतरण तसेच अनेक ई सुविधांशी आधारची जोडणी याबाबत यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती सांगण्यात आली.

पुणे शहराची डिजिटल क्षेत्रातील प्रगती प्रदर्शित

पुणे महानगरपालिका व पुणे स्मार्ट सिटी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या प्रकल्पांचे आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी डिजिटल सादरीकरण स्क्रीनद्वारे तसेच चित्रफीतीद्वारे केले आहे. पुणे महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या दालनातून पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दर्शविण्यात आली आहे.

अत्याधुनिक स्काडा यंत्रणेचा उपयोग केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, एंटरप्राईज जीआयएस प्रणाली, पुणे मनपाचे संकेतस्थळ व नागरिक सहभागाचे विविध डिजिटल उपक्रम, बहुविध उपयोगाचे चॅटबोट यांचे सादरीकरण यातून करण्यात आले असून मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाविषयी चित्रफीतीद्वारे माहिती देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कामाने प्रभावित झालो-हेमंत वाजे

Actress Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

Best Oil For Heart: हिवाळ्यात हृदयरोगाचा धोका वाढतो? नसा ब्लॉक होण्याची भीती? आहारात कोणते तेल वापरावे? FSSAIने दिली माहिती

Bihar : जलवा है हमारा यहाँ! बिहारमध्ये चिराग पासवान चमकले? निवडणुकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT