BJP Saam TV
मुंबई/पुणे

Pune Bypoll: कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना तिकीट मिळणार नाही? भाजप ताकदीचा उमेदवार देण्याच्या तयारीत

Kasba By-Election: हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Prachee kulkarni

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपने देखील ही निवडणूक ताकदीने लढण्यासाठी हालचाल सुरु केली आहे. या निवडणुकीत टिळक कुटुंबियांना उमेदवारी मिळणार नसल्याची दाट शक्यता आहे.

भाजपकडून या निवडणुकीत ताकदीचा उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे. भाजपमध्ये टिळक कुटुंबीय वगळता इतर उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यात भाजपच्या बैठका सुरु आहे. चार नावं प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता होती. मात्र पोटनिवडणूक असल्याने टिळक कुटुबियांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकीत सर्व पक्ष उतरल्याने भाजप देखील सावध भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारपासून सुरू होत असून, ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. भाजपच्या चार इच्छुकांची नावे शहर भाजपने प्रदेश स्तरावर पाठवली आहेत. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT