Nanded City Police arrest two men for extortion attempt by blackmailing a man returning from Budhwar Peth. saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Budhwar Peth : बुधावर पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्यांचा पाठलाग करायचं अन् लुटायचे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Budhwar Peth extortion gang : बुधवार पेठेतून परतणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करून खंडणी मागणाऱ्या दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. धमकी, बदनामी आणि खोट्या तक्रारीद्वारे पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झालं.

Akshay Badve

Pune crime, Budhwar Peth : बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करून लुटणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना समोर आली आहे. बुधवार पेठेतून फिर्यादींच्या नांदेड सिटी मध्ये असणाऱ्या घरापर्यंत मागे मागे जात पैसे मागितले होते. दोन आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून २०००० रुपये ऑनलाइन देतो म्हणून आमच्याकडे कॅश घेतल्याची बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली.

बदनामी करण्याची धमकी

आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेला हात अशी तुमची बदनामी करू असं फिर्यादीला धमकावले. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पोलीस हेल्पलाइन 112 या नंबर वर कॉल केला आणि पोलिसात तक्रार द्यायला सुरुवात केली की यांनी आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केली आहे. त्यानंतर नांदेडला पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी अशा पद्धतीनं फिर्यादीची फसवणूक करत आहेत त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT