Shivneri Fort News Saamtv
मुंबई/पुणे

Shivneri Fort News: किल्ले शिवनेरीवर आलेल्या ७० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला; चिमुकल्यासह ४ जण गंभीर जखमी

Honeybee attack News: शिवनेरीजवळील तुळजा लेणी पहाण्यासाठी हे पर्यटक आले होते. यावेळी पुणे मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला, जेष्ठ नागरिकांसह ७० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला.

रोहिदास गाडगे

Pune Breaking News:

उद्या म्हणजेच १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी, पर्यटक, राज्यातील शिवभक्त शिवनेरीवर गर्दी करताना दिसत आहेत. अशातच शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला शिवनेरीवर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवजयंतीच्या (Shivjayanti Utsav 2024) पुर्वसंध्येला शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्त, तसेच पर्यटक गर्दी करत आहेत. अशातच किल्ले शिवनेरीवर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिवनेरीजवळील तुळजालेणी पहाण्यासाठी हे पर्यटक आले होते. यावेळी पुणे मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला, जेष्ठ नागरिकांसह ७० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला.

या हल्ल्यामध्ये चिमुकल्यासह ४ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमींवर सध्या जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पर्यटकांना पाहून काही हुल्लडबाज तरुणांनी मधमाश्यांच्या मोहोळावर दगड फेक केली. ज्यानंतर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्या शिवजयंतीचा जल्लोष...

दरम्यान, उदया शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अकराशे पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात असणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT