Pune Breaking News Sambhaji Brigade Demand File A Case Against Rupali Chakankar Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: 'रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करा...' संभाजी ब्रिगेडची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?

Pune News: रुपाली चाकणकर यांनी बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मोठी मागणी पुण्यामधील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १२ डिसेंबर २०२३

Pune Breaking News:

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या एका पोस्टमुळे नवा वाद उभा राहिला आहे. रुपाली चाकणकर यांनी बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मोठी मागणी पुण्यामधील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

चाकणकरांवर गुन्हा दाखल करा... संभाजी ब्रिगेडची मागणी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रुपाली ताई चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिवाळी बलीप्रतिपदेच्या दिवशी पोस्ट केलेल्या फोटोमुळे नवा वाद उभा राहिला आहे. १४ नोव्हेंबर रोजी फेसबुकवरुन बहुजनांचा राजा बळीराजाच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करा.. अशी मागणी संभाजी बिग्रेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहेत आरोप?

शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. इतिहासात बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या गुलामगीरी या ग्रंथात सिद्ध केला आहे. त्याच्या डोईवर आक्रमक वामनाने पाय ठेऊन पाताळात घालणारे काल्पनिक चित्र प्रसारीत करणे म्हणजे आपल्या पुर्वजांचा वारसा नाकारून वामनाचे उदात्तीकरण करणे होय.. असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Ashok Saraf: अशोकमामा आणि संकर्षण कऱ्हाडे येणार एकत्र; अभिनेत्याने फोटो शेअर करत म्हणाला, 'आम्हाला दोघांना एकत्रं...'

नांदेडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, ४ जण जागीच ठार

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

SCROLL FOR NEXT