Bus Catch Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO Pune Bus fire : धुराचे लोट अन् प्रवाशांचा आरडाओरडा; धावती बस अचानक पेटली, भयंकर आगीची घटना कॅमेऱ्यात कैद

Running Travel Bus Catch Fire In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये धावती बस अचानक पेटल्याची घटना घडली आहे. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Rohini Gudaghe

पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी एका रस्त्यावरून धावत्या ट्रॅव्हल्स बसने आग लागून अचानक पेट घेतला आहे. नाशिक फाटा येथील कलासागर हॉटेल समोर रस्त्यावरून ही ट्रॅव्हल जात होती. तेव्हा या धावत्या ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतला आहे. बसने पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. तर घटनास्थळी धुराचे मोठमोठे लोट उठताना दिसत होते.

या आगीचं स्वरूप अतिशय भीषण होतं.ट्रॅव्हल्स बसने ज्यावेळी पेट घेतला, त्यावेळी बसमध्ये काही प्रवासी देखील प्रवास करत होते. मात्र, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली (Pune Breaking) आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या ट्रॅव्हल्स बसला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.

ट्रॅव्हल्स बसमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रॅव्हल्स बस मालकाची मोठी वित्तहानी झाली (Bus Catch Fire) आहे. परंतु बस चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झालेली नाही. परंतु प्रवाशांमध्ये मात्र मोठी घबराट होती. आग विझविण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं होतं.

अचानक बस पेटल्यामुळे प्रवाशांची मोठी धांदल उडाली होती. सतर्कतेने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले, त्यामुळे आगीत कोणीही जखमी झाले (Fire News)नाही. आगीचे स्वरूप इतके गंभीर होते की, धुराचे काळे लोट निघत होते. अग्निशमन दलाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली गेली आहे. बसला आग लागल्याच्या अनेक घटना आपण आतापर्यंत पाहिल्या (Pimpri Chinchwad) आहेत. शाॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT