Jogendra Katyare Letter:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Shocking News: कलेक्टर, आमदारांचा त्रास; आत्महत्येची वेळ आलीये, प्रांताधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बने खळबळ

Jogendra Katyare Letter: आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

रोहिदास गाडगेखेड

पुणे, ता. ३१ मे २०२४

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोग आणि महसुलचे अप्पर मुख्य सचिवांना लिहलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवे तसेच आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.

खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी लिहलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूक काळात पुणे रिंग रोड कामाबाबत चौकशी समिती लावून चौकशीत गुंतवुन ठेवल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चुकीची कामे आणि आर्थिक मागणी पुर्ण करत नसल्याने वारंवार तक्रारी केल्या जात असून आता हे सर्व सहन होत नाही, आत्महत्या करण्याची वेळ आलीय, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

तसेच माझ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली नाही, तर उद्या माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदर निवडणूक निर्णय आधिकारी आणि प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत. ज्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांचे हे आरोप फेटाळून लावत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही पलटवार केला आहे. दिलीप मोहिते पाटीलांनी यामध्ये जोगेंद्र कट्यारे यांच्या नियुक्तीपासुनच आक्षेप घेत बदलीमध्ये आणि पुणे रिंग रोड जमिन संपादनात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT