Pune Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: आधी स्वतःचा व्हिडिओ काढला अन् ५ व्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Latest News: पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या रिक्षाचालक तरुणाने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोहिद शेख असे या तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी त्याचा व्हिडिओही शूट केला.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे | ता. ३० नोव्हेंबर २०२३

Pune Breaking News:

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या रिक्षाचालक तरुणाने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोहिद शेख असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी स्वतःचा व्हिडिओ बनवत त्याने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील कोंढवा (Kondhava) परिसरात राहणारा तोहिद शेख हा शेख हा अरबाज वली मोहम्मद मेमन यांच्याकडे ड्रायव्हर व सुपरवायझर म्हणुन 4 वर्षांपासून नोकरीस होता. त्यांच्यामध्ये काल कामावर न आल्यावरुन वाद झाला होता. यावरुन अरबाज वली याने तोहिद शेखला त्याच्या सासऱ्यासमोर शिवीगाळ केली.

हा अपमान सहन न झाल्याने तोहिदने कोसर बाग येथील काम चालु असलेल्या 6 व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तरुणाने स्वतःचा व्हिडिओ शूट केला असून त्यामध्ये त्याने यामागचे कारण सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तोहिद शेखच्या पश्चात दीड दोन वर्षाचा मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केली . या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी घेतली असून अधिक तपास सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कमरेपर्यंत लांब, दाट केस हवेत? मग शॅम्पूमध्ये मिक्स करा हे दोन घरातील पदार्थ, केस गळणं होईल कमी

Eye health tips: डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नका; वेळेत उपचार केल्यास अंधत्वाचा धोका होईल कमी

Watermelon Eating Time: उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? कोणत्या वेळी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो?

पाणी जपून वापरा! पुण्यात पाणी टंचाई; कुठल्या धरणात किती आहे पाणीसाठा?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील IT कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरण

SCROLL FOR NEXT