Mangaldas Bandal 
मुंबई/पुणे

Pune News: ब्रेकिंग! मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक; १६ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

Pune Breaking News: पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडीने मोठी कारवाई केली असून मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे.

रोहिदास गाडगेखेड

पुणे, ता. २१ ऑगस्ट २०२४

पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानीअंमलबजावणी संचालनालयने (ईडी) मोठी कारवाई केली असून मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. काल सकाळपासून बांदल यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. त्यानंतर रात्री साडे ११ वाजण्याच्या सुमारास बांदल यांना अटक करुन मुंबईमध्ये नेण्यात आले आहे. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीची मोठी कारवाई!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडीने मोठी कारवाई केली असून मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. कालपासून (मंगळवार, १९ ऑगस्ट) मंगलदास बांदल यांच्या शिरुर तालुक्यातील शुक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाडीमधील घरांमध्ये ईडी चौकशी सुरू होती.

मंगलदास बांदल यांना अटक

या चौकशीदरम्यान, बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीची चार मनगटी घड्याळे ही आढळून आलीत. या १६ तासांच्या चौकशीनंतर रात्री साडे ११ वाजण्याच्या सुमारास मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर मंगलदास बांदल यांना मुंबईला नेण्यात आले आहे. आज दुपारी बांदल यांना मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत मंगलदास बांदल?

दरम्यान, मंगलदास बांदल हे पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नाव आहे. याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. मात्र गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. याशिवाय २००९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणूकही लढवली होती. तसेच मंगलदास बांदल हे याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जिल्हा बँकतील कथित घोटाळ्यामध्ये ते दोन वर्ष तुरुंगात होते. मागच्याच वर्षी ते तुरुंगातून बाहेर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT