Rupali Chakankar Vs Supriya Sule Saamtv
मुंबई/पुणे

Rupali Chakankar News: 'सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..' रुपाली चाकणकरांची टीका

Rupali Chakankar Vs Supriya Sule: 'दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय..." अशी टीका त्यांनी केली.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १ जानेवारी २०२४

Rupali Chakankar News:

लोकसभा निवडणूकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होताना होत आहेत. अशातच अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया ताई गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच निवडून आले आहेत.. अशी खोचक टीका केली आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

"अजितदादांनी (Ajit Pawar) जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे. असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच आगामी निवडणूकीत महायुतीचा विजय होईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळेंवर टीका

यावेळी बोलताना रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला. "दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. विकासाचे राजकारण हवं आहे. सुप्रिया ताई (Supriya Sule) गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच निवडून आल्या आहेत. दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय..." अशी टीका त्यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामतीत महायुतीचा विजय...

यावेळी बोलताना रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढवण्यावरही मोठे विधान केले. "प्रत्येकाची लढण्याची इच्छा असते,स्पर्धेक असतात त्यामुळे खडकवासला मध्ये अनेक इच्छुक आहेत, असे त्या म्हणाल्या. तसेच बारामती लोकसभेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल..." असा दावाही त्यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT