Pune Breaking News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking News: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात संपवले आयुष्य

Kopardi Death case Update: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या कोपर्डी हत्या प्रकरणासंबंधी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Yerawada Jail News: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या कोपर्डी हत्याकांड प्रकरणासंबंधी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवड्या कारागृहातील बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Ahmednagar Kopardi Death Case)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.

या अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा (Yerawada Jail) कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा हा या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवार( 10 सप्टेंबर) सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जेल प्रशासन हादरुन गेले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, शिक्षा भोगत असतानाच आरोपीने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT