pune crime news  saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात Bscच्या विद्यार्थ्याने स्वत:ला संपवले, १९ वर्षीय तरूण मूळचा नाशिकचा

Pune Latest News: घटनेची माहिती मिळताच ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Breaking News: विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ओम कापडणे असे या तरुणाचे नाव असून तो बी. एस्सी. च्या तिसऱ्या वर्गात शिकत होता.

तरुणाने पुण्यातील वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या केलेला तरुण हा मुळचा नाशिकचा असून तो विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. (Crime News in Marathi)

घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळली नसल्याने तरुणाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आले नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत असून १९ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

KBC 17: कृष्णाने अचानक अमिताभ बच्चन यांना विचारली त्यांची फी; बिग बी उत्तर देत म्हणाले...

Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

SCROLL FOR NEXT