एकनाथ शिंदे SaamTV
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील गुंठेवारीबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वपूर्ण भाष्य!

लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये सर्वांचा सहभाग असणार आहे असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : शिवसेनेचे नगरसेवक नगरसेवक नाना भानगिरे यांच्या विकास निधीतून कै.दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालय व कै. मधुकर रंगुजी घुले भाजी मंडईचा लोकार्पण सोहोळा आज पार पडला. या सोहळ्यास शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यात निर्माण ह्या होणाऱ्या महत्वपूर्ण रिंग रोडला विरोध केला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार लोकांच्या हितासाठी काम करत असून आमचे सरकार लोकहितासाठीचे निर्णय घेईल.

वेगळ्या हडपसर महापालिकेसंदर्भात सुरु असणाऱ्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले वेगळ्या हडपसर महानगरपालिकेचा कोणताही वेगळा प्रस्ताव नाही.

हे देखील पहा :

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत :

राज्यात महाविकास आघाडी सरकार असून नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परीषद निवडणुकांत महविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. त्यामुळे आगामी निवडणुकांतील आघाडीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

११ ऑक्टोबर महाराष्ट्र बंद :

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान भाजपच्या केंद्रीय मंत्री पुत्राने शेतकऱ्यांवर मोटारगाडी चालवली होती. यात ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने उद्या दि.११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे या संप होणार असून यामध्ये सर्वांचा सहभाग असेल.

पुण्यातील गुंठेवारीबाबत :

गुंठेवारी बाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असून त्यासंदर्भात आयुक्तांना सोबत घेऊन मुख्यमत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे. त्यामुळे प्रलंबित असणाऱ्या पुणे शहरातील गुंठेवारी बाबत निर्णय घेऊन गुंठेवारीच्या प्रश्नाची अडचण नक्कीच दूर केली जाईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT