Pune Bhor tempo accident  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

Pune accident news : पुण्यातील भोरमध्ये भरधाव टेम्पोने खेळणाऱ्या बहीण-भावाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. यात ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Bhor tempo accident children killed details : चिमुकले बहीण-भाऊ घराबाहेर खेळत होते. मुलाचं वय ८ तर मुलीचं वय फक्त ६ वर्षे होते. दोघेही खेळण्यात घराच्या अंगणात दंग होते, पण त्याचवेळी नियतीनं घाला घातला. एका भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं दोघांनाही चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा रूग्णालयात मृत्यूसोबत लढत आहे. मुलीचं नाव पायल असे आहे, तर मुलाचे नाव लवकुश असे आहे. पुणे जिल्ह्यातील बोरमधील पिराचा मळा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. एका क्षणात हसत्या खेळत्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला.

पुण्याच्या भोरमधील पिराचा मळा परिसरात घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्या बहीण - भावाचा भरधाव टेम्पोने चिरडले. या अपघातात ८ वर्षांच्या पायलचा राधेशाम भारती हिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा लवकुश राधेशाम भारती (वय- ६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नियतीने घाला घातल्यामुळे बहीण भाऊ दुरावले गेले अन् घरावर एका क्षणात दुख कोसळलेय.

रस्त्याच्या कडेला घरासमोरील जागेत झाडाच्या सावलीत बहीण-भाऊ खेळत होते..यावेळी रस्त्यानी जाणाऱ्या एका भरधाव टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले अन् टेम्पो रस्ता सोडून थेट अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांना धडकला. यात मुलगी टेम्पो खाली सापडल्याने जागेवरच मृत्यू झाला तर मुलगा टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झाला आहे. मुलाचा पाय मोडलाय, त्याशिवाय डोक्याला जोरदार मार लागला आहे. रूग्णालयात तो मृत्यूसोबत लढत आहे. त्या चिमुकल्याला बहिणीचा मृत्यू झाल्याचेही माहिती नाही.

या अपघाताप्रकऱणी भोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोर पोलिस पुढील तपास करत आहेत. पिराच्या मळ्यातील खासगी कंपनीत काम करणारे राधेशाम भारती यांची मुलगी पायल राधेशाम भारती (वय-८)व मुलगा लवकुश राधेशाम भारती (वय- ६)रा.पिराचामळा भोर (उत्तर प्रदेश) दोघे रस्त्याच्या कडेला घरासमोरील जागेत खेळत होते. यावेळी रस्त्यानी येणाऱ्या भरधाव टेम्पोने मुलांना धडक दिली. यात कुटुंबाची लाडकी पायलचा मृत्यू झालाय. तर लवकुश मृत्यूसोबत लढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded ZP School: जिल्हा परिषदेची शाळा कोणत्या गावाची? शाळेचा वाद थेट पोलिसांच्या दारात, काय आहे प्रकरण?

दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरण अंगलट; 3 बड्या अधिकऱ्यांचे निलंबन तर तिघांना बडतर्फ

1 Gram Gold Mangalsutra: सोन परवडत नाही? पण सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे? ट्राय करा 1 ग्रॅम सोन्याचे ट्रेंडी मंगळसूत्र

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांनी येवल्याच्या प्रांताधिकारी कार्यालयावर फेकले कांदे

Maharashtra politics : १५ महिन्यात राष्ट्रवादीच्या ३ दिग्गजांचे राजीनामे, २ मंत्र्यांचा समावेश, नेमकी कारणं काय?

SCROLL FOR NEXT