Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Baramati bypoll : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार, कुणी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

Baramati by-election 2026 nomination candidates list details : बारामती पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक रंगणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Sunetra Pawar election contest opponents first day nominations : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar latest news) या बारामतीमधून निवडणूक लढणार, हे जवळपास निश्चित झालेय. पण आता त्यांच्याविरोधात ३ जणांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण हे तिन्ही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाहीत. जत, सातारा आणि सोलापूर या ठिकाणातील उमेदवार असल्याची माहिती मिळाली. (Baramati bypoll candidates list)

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, स्थानिक पातळीवरून एकही अर्ज न येता थेट बाहेरील इच्छुक उमेदवारांनी उमेदवाराने अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार,बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून,4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. (Maharashtra by-election 2026 schedule)

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या तिघांपैकी एकही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाही. जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टीकडून,सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणा-कोणाचा अर्ज कायम राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता पहिल्याच दिवशी ३ अर्ज आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत आता कोण कोण मैदानात असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT