Pune Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली गोरख धंदा, पोलिसांनी छापा टाकताच सर्व सैरभैर; पुण्यात खळबळ

Pune Crime News : परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

Akshay Badve

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापर सुरु असलेल्या स्पा सेंटरवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केलीय. या छाप्यात १८ मुलींची पोलिसांनी सुटका केलीय. पुण्यातील उच्चभ्रू बाणेर आणि विमानतळ भागात हा गोरख धंदा सुरु होता. धक्कादायक बाब म्हणजे १८ मुलींपैकी १० पेक्षा अधिक मुली या परदेशी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. विमानतळ परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून एकूण १८ मुलींची सुटका करण्यात आली आहे. या १८ मुलींपैकी १० परदेशी आणि २ भारतीय आहेत. या स्पा सेंटरच्या जागा मालकासह, स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्या कारवाईत, उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या बाणेरमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत २ मुलींची सुटका करण्यात आली आहे. या स्पा सेंटरच्या मालकावर तसेच स्पा चालवणाऱ्या मॅनेजरवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT