pune viral video x
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Pune Viral Video : पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तरुणांच्या हातात कोयते, हातोडी असल्याचे दिसते.

Yash Shirke

Pune : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोयते, हातोड्याने पुण्यात मारहाण करत राडा झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये घडली आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण हातात कोयते घेऊन कॉलेज परिसरात मारहाण करत असल्याचे दिसते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. काही तरुण कोयते, हातोड्याने हाणामारी करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या मारमारीमध्ये दोन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये कोयते आलेच कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुण एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसते. या तरुणांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचेही पाहायला मिळते. हाणामारी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचेही व्हिडीओत दिसते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला.

पुण्यात अश्लील कृत्य

पुण्यात एका ७३ वर्षीय व्यक्तीने २७ वर्षीय तरुणीशी अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी ही एका खासगी क्लिनिकमध्ये काम करते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. ही घटना पुण्यातील विश्रामबाग रोड परिसरात घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक, वाचा संडे कलेक्शन

SCROLL FOR NEXT