Pune: लोहगाव विमानतळ 15 दिवस बंद राहणार! Saam TV
मुंबई/पुणे

Pune: लोहगाव विमानतळ 15 दिवस बंद राहणार!

16 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 15 दिवस पुणे विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे - 16 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 15 दिवस पुणे विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या १५ दिवसांच्या काळात प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून रहावे लागणार आहे.

गेल्या वर्षीच लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. तेव्हापासूनच लोहगाव वरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात येत होती. त्यामुळे जवळपास वर्षभर लोहगाव वरून केवळ दिवसाच उड्डाणे होत होती परंतु आता ती देखील बंद असणार आहेत.

16 ऑक्टोबरला सकाळपासून 30 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ही हवाई सेवा बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगतिले आहे. विमानतळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे आधीपासून बुकिंग असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतप्त गावकऱ्यांचा भोंदूबाबाला चोप, गावकऱ्यांनी कशी घडवली अद्दल? VIDEO

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

SCROLL FOR NEXT