Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

Accident On Navale Bridge: पुण्यातील नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवले पुलावर भयंकर अपघात झाला. भरधाव ट्रकने ६ वाहनांना धडक दिली. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • पुण्यातील नवले पुलावरे भीषण अपघात

  • भरधाव ट्रकने सहा वाहनांना जोरदार धडक दिली

  • ट्रकच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने एक एक करत सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नऱ्हे येथील नवले पूल चौकात हा भयंकर अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर पुणे- बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पौलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नऱ्हे येथील नवले पूल चौकात आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने सहा वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये सहाही वाहनांचा चुराडा झाला. या वाहनांमध्ये दुचाकी आणि कारचा समावेश आहे. कात्रजकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी आणि कारसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाला.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर असलेल्या दुचाकी आणि कारला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकने वाहनांना दिलील धडक इतकी जोरदार होती की सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT