Pune Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यामध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Pune Police: पुण्यामध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील कात्रज चौकात ही घटना घडली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये एकाचा मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौकामध्ये हा अपघात झाला. सकाळी आठच्या सुमारास दुचाकीस्वाराला भरधाव टेम्पोने चिरडलं. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा तपास कात्रज पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. कात्रज बायपास चौकात टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद इकबाल पठाण (वय २१ वर्षे) असं मृत तरुणाचे नाव आहे.

या अपघातानंतर घटनास्थळावर एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या अपघात प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक अमोल भारगुडे( ४० वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली. या अपघात प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. दुचाकीस्वारानेच सिग्नल मोडल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT