Pune Accident Video  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident Update: २५ वाहनांना उडवून कंटेनरवाला सुस्साट सुटला; रस्त्यावर सिनेस्टाइल पाठलागाचा थरार, लोकांनी केबिनबाहेर ओढून कुटला! VIDEO

Speeding container driver hits 25 vehicles in Pune: चाकण - शिक्रापूर रस्त्यावर एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर चालकाला पकडण्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

पुण्यातील चाकणमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव कंटेनरने २५ वाहनांना धडक दिली. चाकण-शिक्रापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर घेऊन चालक पळून गेला. पण पोलिसांनी आणि स्थानिक तरूणांनी बाईकवरून त्याचा पाठलाग करत कंटेनर चालकाला पकडून चोप दिला आणि अटक केली. चालकाच्या अटकेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

भीषण अपघात ते कंटेनरचा थरारक पाठलाग आणि नंतर चोप (व्हिडिओ बघा)

मिळालेल्या माहितीनुसार, आज चाकण - शिक्रापूर रस्त्यावर एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना जोरदार धडक दिली. जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत हा कंटेनर समोर येईल त्या वाहनांना धडक देत होता. या अपघातानंतर कंटेनर चालक तिथे थांबण्याऐवजी त्याने पळ काढला. या अपघातानंतर पोलिसांनी आणि संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी कंटेनरचा पाठलाग केला. यावेळी कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिली.

अखेर संतप्त नागरिकांनी त्या कंटेनरचा दुचाकीवरून पाठलाग केला. व्हिडीओमध्ये पाहिलं चाकणमधील वाजेवडी येथे जवळपास २० ते ३० दुचाकीस्वार यांनी कंटेनरवर दगडफेक करत तो थांबवला आणि चालकाला चोप दिला. यावेळी त्यांनी कंटेनरच्या टायरची हवा देखील सोडली. कंटेनर चालक अकिब खान याला पोलिसांनी अटक केली आहे.

हा कंटेनर शिक्रापूर दिशेने जात होता त्यावेळी त्याने २५ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. या सर्वांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

SCROLL FOR NEXT