Pune Accident News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News : भोरच्या वरंधा घाटात मिनी बस दरीत कोसळली, चालकाचा मृत्यू

Accident News : चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

भोरच्या वरंधा घाटात मिनी बसला भीषण अपघात झाला आहे. बस ६० फूट दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड ते शिरगाव दरम्यान शिरगाव हद्दीत ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. धरणाच्या पाण्यापासून ५ फुटावर गाडी अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघातात चालक अजिंक्य कोलते जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गाडीत चालकासह १०-११ प्रवासी होते. ते सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जखमींना भोर‌ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

SCROLL FOR NEXT