Pune Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यात भररस्त्यात मालवाहू ट्रेलर उलटला; आपघातामुळे वाहतूक पूर्णता विस्कळीत

Pune Accident News: गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला.

साम टिव्ही ब्युरो

Pune News:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक राजभवनजवळ मालवाहू ट्रेलरचा अपघात झाला आहे. अपघातात ट्रेलर रस्त्यावर उलटला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्त्यावरील वाहतूक पूर्णता विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रेलर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला. ट्रेलर मोठा असल्याने संपूर्ण रस्ता अडवला गेला आहे.

पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.

मित्राच्या लग्नाला गुजरातहून आलेल्या मित्रांच्या कारला अपघात

अकोला येथे देखील मध्यरात्री असाच एक भीषण अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावर काल मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना येथे घडली. चारचाकी वाहनात प्रवास करणाऱ्या व्यक्ती मित्राच्या लग्नाला गुजरातहून वरुडकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली.यात एकाचा मृत्यू तर चौघे जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT