PuneAccident News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Accident News: इमारतीवरून डोक्यात सळई पडून ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, शाळेतून घरी जाताना घडली दुर्घटना

Pune Accident News: पुण्यात बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Accident News

पुण्यात बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुद्र केतन राऊत (रा. विरभद्र नगर बाणेर) असे या मुलाचे नाव असून कुंटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाणेर येथील गणराज चौकानजीक मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास या इमारतीच्या पहाडाचे काम सुरू होते. याच दरम्यान रुद्र राऊत हा ९ वर्षांचा मुलगा शाळेतून घरी जात होता. रुद्र या इमारतीच्या खाली आला असताना इमारतीवरून लोखंडी सळई त्याच्या डोक्यात पडली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवघ्या ९ वर्षांच्या मुलाचा असा दुर्दैवी मृ्त्यू झाल्यामुळे सदर कुंटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून संबंधित बांधकाम कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT