Pune Accident News: Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: भरधाव रुग्णवाहिकेची ट्रकला धडक; अपघातात १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News: पुण्यात भरधाव रुग्णावाहिकेने ट्रकला धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune Accident News:

पुण्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. पुण्यात भरधाव रुग्णावाहिकेने ट्रकला धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात जांभूळवाडी रस्त्यावर ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात भरधाव रुग्णवाहिका ट्रकवर पाठीमागून आदळल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर या मुलाचे तिघे नातेवाई किरकोळ जखमी झाले आहेत.

पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात जांभूळवाडी रस्त्यावरील दरी पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात किरण अंकुश अवताडे या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

तर रुग्णवाहिका चालक सद्दाम सुतार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर अनिता अवताडे, अंकुश अवताडे आणि सुखदेव अवताडे हे किरकोळ जखमी झाले.

या अपघात प्रकरणी ट्रकचालक निती मधुकर गवते (वय, ३६) यांनी फिर्याद दिली आहे. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या महामार्गावर मोटर सायकलला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. डंपरने मोटरसायकला धडक दिल्याने अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर शहरालगत अपघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT