Pune Accident saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भीषण अपघात! कारची डंपरला धडक, इंजिनचा चक्काचूर झाल्यानंतर कारने पेट घेतला अन्...

Pune Accident : भुकुम येथे एका चारचाकी कारने डंपरला धडक मारली. धडकेनंतर कारचा पुढचा भाग पूर्णपणे दबला गेला आणि त्याला आग लागली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Yash Shirke

  • पुण्यातील भुकुममध्ये भीषण अपघात

  • कारची डंपरला जोरदार धडक

  • सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Accident News : पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम येथे भीषण अपघात घडला. एका डंपरला चारचाकी कारची जोरदार धडक झाली. या घटनेमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारच्या पुढच्या भागाला आग लागल्याचेही म्हटले जात आहे. याशिवाय कारमधील चालक देखील गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात पुणे-कोलाड रस्त्यावर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-कोलाड रस्त्यावर चारचाकी कारची डंपरला धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली. डंपरला कार आदळल्याने कारच्या पुढील भागाला आग लागली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण कारचालकाच्या छातीला मार लागला. ही घटना आज (१७ ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

अपघाताच्या वेळी चार ते पाच जण कारमध्ये बसले होते. कार्तिक जयेश हाडके (वय २१ वर्षे, रा. लोणी काळभोर) हा तरूण कार चालवत होता. डंपर-कारची धडक झाल्यानंतर त्याच्या छातीला मार लागला आणि तो जखमी झाला. कारमधील इतरांना काहीही झाले नाही. कारमधील चार-पाच मित्र हे पिरंगुटच्या दिशेने निघाले असताना हा अपघात झाला.

कृषि विभागाच्या बीजगुणन प्रक्षेत्रासमोर पिरंगुटहून पुण्याच्या दिशेने एक डंपर चालला होता. या डंपरचा चारचाकी कारची धडक बसली, त्यात कारचा पुढचा भाग पूर्णपणे दबून गेला. धडक इतक्या तीव्रतेने झाली की, गाडीने पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये असलेल्या एअर बॅग्स उघडल्याने कारचालक थोडक्यात बचावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT