Pune residents form a human chain on Ganeshkhind Road to protest against the proposed cutting of over 2,000 trees. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Pune Tree Cutting 2000 Trees Green Cover Threat: राज्यात विकासाच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल केली जातेय. अशातच आता पुण्यात तब्बल 2 हजार झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे शहराचं 'ग्रीन कव्हर' कसं धोक्यात आलयं... पुणेकरांनी मानवी साखळीतून झाडांना वाचवण्यासाठी कशी मोहिम उभारलीय...

Suprim Maskar

विद्येचे माहेरघर आणि एकेकाळचे 'पेन्शनर्स पॅराडाईज' असणाऱ्या पुण्याची ओळख आता सिमेंटचे जंगल' अशी होऊ लागलीय...रस्ता रुंदीकरण, मेट्रो आणि नद्यांच्या नावाखाली विकासाचा रथ पर्यावरणाला पायदळी तुडवतोय...रस्ता रुंदीकरण आणि विविध विकासकामांच्या नावाखाली पुणे महानगरपालिकेने चक्क 2000 पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रस्ताव मांडलाय...

पुण्यातील एकट्या गणेशखिंड रस्त्यावरील तब्बल 529 झाडांवर टांगती तलवार आहे. त्यातील 60 झाडं पूर्णपणे तोडली जाणार असून 469 झाडाचं पुर्नरोपण करण्यात येणार आहे... दरम्यान प्रस्तावात एकूण 2 हजार झाडांची कत्तल केली जाणार असून त्यात कडुलिंब, उंबर, निलगिरी, बदाम, नारळ आणि ऐतिहासिक वडाच्या झाडांचा समावेश असेल...

दुसरीकडे या प्रस्तावावर पर्यावरण प्रेमी तसेच पुणेकरांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. तसेच पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर वृक्ष संवर्धन समितीनं मानवसाखळी तयार करत पर्यावरण वाचवा झाडे तोडू नका असा संदेश देत... पुणेकर झाडांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले...

दरम्यान या प्रकरणावर पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सारवासारव करत... अद्याप प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय... तसचं काही प्रकल्पांसाठी गरज पडेल त्याच झाडांची तोड करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय....मात्र फक्त सार्वजनिक बांधकामच नाही तर खाजगी बांधकामातही बेकायदेशीरपणे शेकडो झाडांची कत्तल होतेय...त्यामुळे वेगाने होणाऱ्या विस्तारासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणंही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यातील विकास योजनांमध्ये पर्यावरणीय बाबींना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित होतेय. हे झालं नाही तर काँक्रीटीकरणच्या जंगलात माणसांना श्र्वास घेणं ही कठीण होईल, हेच कटू वास्तव आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT