धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या; तमिळनाडूतील घटनेचे वसईत पडसाद चेतन इंगळे
मुंबई/पुणे

धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या; तमिळनाडूतील घटनेचे वसईत पडसाद

शाळेतील शिक्षिका रेकलीन मेरी व सगया मेरी यांनी तिच्यावर गेल्या २ वर्षापासून ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी केलेल्या त्रासामुळे या मुलीने आत्महत्या केली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई : तामिळनाडू (Tamilnadu) राज्यातील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी विद्यार्थीनी एम.लावण्या हिने विष पिऊन आत्महत्या केली आहे. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या स्टेटमेंट मध्ये देखील स्पष्ट उल्लेख केला आहे की, शाळेतील शिक्षिका रेकलीन मेरी व सगया मेरी यांनी तिच्यावर गेल्या २ वर्षापासून ख्रिश्चन (Christian) धर्मात धर्मांतरण करण्यासाठी केलेल्या त्रासामुळे ती आत्महत्या करत आहेत.

एम.लावण्या ही ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण (Conversion to Christianity) करत नसल्यामुळे तिला शौचालय साफ करणे, झाडू मारणे, भांडी धुवायला लावणे अशी शाळेतील कामे लावून शिक्षकांनी तिचा मानसिक छळ केला. भारतीय राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असताना अशा प्रकारे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शाळेच्या माध्यमातूनच धर्मांतरण (Conversion) करायला लावणे हे निंदनीय आणि संतापजनक आहे. त्यामुळे एम.लावण्या हिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहाबाहेर तमिळनाडू सरकार मधील मंत्र्यांकडून आरोपींचे स्वागत करणे, हे देखील संतापजनक आहे.

अभाविपच्या (ABVP) राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी या तमिळनाडू येथे लावण्याच्या न्यायासाठी आंदोलन करत असताना त्यांना व अभाविप कार्यकर्त्यांना दडपशाही पद्धतीने अटक करण्यात आली. या घटनेतील संबंधित आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अभाविपच्या वतीने आज वसई स्टेशन मनपा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा -

जोपर्यंत एम.लावण्या हिला न्याय मिळत नाही तोपर्यंत अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करेल", असा इशारा अभाविप ने दिला आहे. यावेळी उपस्थित रुपाली परदेशी,वसंत पवार, विकास यादव,निशा भारती,मनीषा मोदी व अभाविप जिल्हा संघटनमंत्री वैभव सोलनकर आदि कार्यकर्ता उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

फक्त २ मिनिटांचा चमत्कार! 'ओम' च्या उच्चाराने शरीरात होतील 5 मोठे बदल

LPG Connection Update : ...तर ८ दिवसांत तुमचं LPG गॅस कनेक्शन होणार बंद; Indane, HP आणि Bharat गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

SCROLL FOR NEXT