अंबरनाथमध्ये सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध  अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केले. ठाण्यात फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केले. ठाण्यात फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा -

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना एका परप्रांतीय फेरीवाल्याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. या घटनेत पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली होती. तर, त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले होते. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. यानंतर आता अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही आज एक दिवस कामबंद आंदोलन करत या घटनेचा निषेध केला.

या आंदोलनात पालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. फक्त अत्यावश्यक सेवा या आंदोलनातून वगळून सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना या आंदोलनाचा फारसा त्रास झाला नाही. मात्र संपूर्ण प्रशासकीय कामकाज यावेळी बंद ठेवण्यात आले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT