Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Alandi News : आळंदीमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार; १४ जणांविरुद्ध गुन्हा

राज्यात तात्काळ धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा अशी मागणी नागरिक करतांना दिसत आहेत.

गोपाळ मोटघरे

Alandi Latest News : चर्च मध्ये या, तुमच्या धंद्याला आम्ही मदत करू असं आमिष दाखवत काही धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत आल्याची घटना आळंदीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेची तक्रारी करण्यात आली होती. त्यानंतर मोठी कारवाई करत १४ जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. काल म्हणजे मकर संक्रातीच्या दिवशी हा प्रकार घडला आहे.

धर्म प्रसार करणाऱ्या काही लोकांना आळंदी (Alandi) परिसरातील नागरिकांनी जाब विचारला तेव्हा प्रसारक आणि त्यांच्यात काही प्रमाणात वाद देखील झाला. ही बाब पोलिसांना (Police) कळताच ते दाखल झाले आणि त्यांनी सर्वांची चौकशी करून तक्रारी नुसार दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केल्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे दाखल करण्यात आलेले सर्वजण भोसरी परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. तर आरोपी मध्ये महिला, अल्पवयीन मुलगी आणि त्याचं बरोबर म्युंगी युन आणि ज्युयेल यून या परदेशी नागरिकांचाही देखिल समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात अशाच प्रकारे आमिष दाखवून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा ही घटणा समोर आल्याने, राज्यात तात्काळ धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा अशी मागणी नागरिक करतांना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT