Pune Tourist Places Saam tv
मुंबई/पुणे

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

Pune News: पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही पुण्याच्या पर्यटनस्थळी भेट देण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी ही बातमी वाचा.

साम टिव्ही ब्युरो

पुणे विद्येचे माहेरघर असण्यासोबत निसर्ग संपन्न जिल्हा आहे. पुण्यात जोरदार पावसाळा सुरुवात झाली असून येथील घाट परिसरात बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेत. येथील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात अनेक ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले पर्यटनस्थळे आणि धरणे आहे.

मुंबईसह राज्यभरातून पर्यटक येथील भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात येत असतात. यातच वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसें यांनी जमावबंदी आदेश दिलेत. याआधी भिमाशंकर अभारण्य वघळता इतर ठिकाणी सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना ३० सप्टेंबर पर्यत बंदी घालण्यात आली होती. या आदेशच पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येतील, असं सांगितलं जात आहे.

कुठल्या ठिकाणी आहे जमावबंदी?

- मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली' (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे.

- लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, खंडाळा, सहारा ब्रीज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर.

- मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा.

- हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर.

- आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा.

- जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह.

- भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा.

- खेड तालुक्यातील भिमाशंकर चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर.

- इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटींग क्षेत्रात हे आदेश लागू असतील.

पर्यटन स्थळावर बंधने

- पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी.

- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे.

- खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.

- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.

- पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध राहील.

- धबधब्यावर मद्यपान करणे.

- मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.

- मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.

- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.

- वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.

- सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या.

- थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT