Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव; ठाकरेंच्या शिवसेनेवर अपक्षांचा गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्याभरात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीवरुन चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यातच आता शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षावर अंधेरी पोटनिवडणूकी संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहे. अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता तसेच अजूनही दबाव आणला जात आहे असा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी ठाकरे गटावर केला आहे.

याप्रकरणी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी निवडणुक आयोगाकडे एक पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते असे देखी मिलिंद कांबळे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. यावर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने माघार घेतली आहे. उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज परत घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. आम्ही अर्ज परत घेत आहोत, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुरजी पटले हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाचा मुद्दा

निवडणूक आयोगाने (Election Commission) अंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर या रणसंग्रामात उमेदवार कोण असेल यापेक्षा निवडणुकीत फूट पडलेल्या शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाचा मुद्दा पुढे आला. निवडणुकीआधी हा पेच सोडवणे महत्त्वाचे होते. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला. त्यामुळे आपल्या पसंतीचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून चढाओढ सुरु झाली. अखेर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT