शिवसेना भवनात उद्या पुन्हा पत्रकार परिषद, Sanjay Raut करणार मोठा धमाका? Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेना भवनात उद्या पुन्हा पत्रकार परिषद, संजय राऊत करणार मोठा धमाका?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या मुंबईत शिवसेना भवनामध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या मुंबईत शिवसेना भवनामध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. स्वतः राऊत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यावेळी देखील ते भाजपच्या नेत्यांवर शरसंधान साधणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वेळेस त्यांनी या ठिकाणी याच वेळेला पत्रकार परिषद घेत भाजपबरोबरच (BJP) केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. (Press conference again tomorrow at Shiv Sena Bhavan)

हे देखील पहा-

संजय राऊत यांनी ट्विट (Tweet) करत सांगितले आहे की, "उद्या संध्याकाळी ४ वाजता आम्ही शिवसेना (Shiv Sena) भवनात पत्रकार परिषद घेत आहोत.या पत्रकार परिषदेकडे लक्ष राहू द्या, जय महाराष्ट (Maharashtra)." या अगोदर १४ फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती.

यावेळी भाजपवर (BJP) निशाणा साधताना पुढील काही दिवसात भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कोठडीमध्ये असणार आहेत आणि देशमुख बाहेर राहतील, असे म्हटले होते. भाजपमध्ये किती दम आहे, ते पाहू असे थेट आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले होते. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचे सांगत असताना या यंत्रणांवर जाणून बुझून ठाकरे (Thackeray) कुटुंबियांना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते.

याचबरोबर विनाकारण या यंत्रणांकडून सत्ताधारी लोकांच्या नातलगांना त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला होता. यावेळी राज्यात शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांसह राऊत यांनी मोठ शक्ती प्रदर्शनही केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT