pravin Gaikwad  Saam tv
मुंबई/पुणे

Pravin Gaikwad Breaking : मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींनी काळं फासलं

pravin gaikwad sambhaji brigade : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याची घटना घडलीये. अक्कलकोटमध्ये हा प्रकार घडला.

विश्वभूषण लिमये

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळ फासल्याची घटना घडली आहे. अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींकडून काळ फासण्यात आलं आहे. या प्रकारानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. गायकवाड यांना काळं फासल्यानंतर शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हा संपूर्ण प्रकार घडला. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी गायकवाड यांना काळं फसल्याची माहिती मिळत आहे.

प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग हा शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन संघटनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण केले होते.

नेमकं काय घडलं?

अक्कलकोटमध्ये आज रविवारी प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं. गायकवाड यांना काळ फासल्यानंतर घोषणाबाजी देखील केली.

प्रवीण गायकवाड यांच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनासमोर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवधर्म फाउंडेशनने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर संभाजी ब्रिगेडने संघटनेच्या नावात 'छत्रपती संभाजी' महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही, तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गाबरोबरच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार, टॅक्स वाढवावा लागेल, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Shivsena: ..तोपर्यंत 'धनुष्यबाण' गोठवा; शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज होणार सुनावणी

Gauri Nalawade: 'फूलाआड दडलेलं सौंदर्य....' गौरी नलावडेनं केलं फोटोशूट

Sawan Somvar Upay: श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बनतोय दुर्लभ संयोग; 'या' उपायांनी दूर होईल आर्थिक तंगी

SCROLL FOR NEXT