Maharashtra Politics: अनिल देशमुख कुठे आहेत? प्रविण दरेकरांचा सवाल
Maharashtra Politics: अनिल देशमुख कुठे आहेत? प्रविण दरेकरांचा सवाल  
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अनिल देशमुख कुठे आहेत? प्रविण दरेकरांचा सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'अनिल देशमुख गायब आहेत. ते कुठे आहेत हे राष्ट्रवादी पक्षाने सांगावे. अनिल देशमुख हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. पोलीस आयुक्त कुठे बेपत्ता आहेत कळत नाही. राज्याच्या गृह मंत्र्यांनी पोलीस आयुक्त कुठे आहेत हे सांगायला हवे. आपल्या खात्यातील माणूस कुठे आहे हे महित नसणे यावरून पोलीस खात्यात काय गोंधळ सुरू आहे हे स्पष्ट होतं,' अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान गेल्या आठवड्यातच मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी (ED Lookout Notice) केली. 100 कोटी रुपयांचे वसुली आदेश प्रकरणात ईडीने (ED) ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. देशमुखांना आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना अखेर लूकआऊट नोटीस जारी जारी करण्यात आली आहे.

या लूकआऊट नोटीसमुळे आता अनिल देशमुख यांना देशाबाहेर जाता येणार नाही. इतकेच नव्हे तर लूकआऊट नोटीसनुसार पोलीसांना देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशभरातील विमानतळांनादेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जर त्यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विमानतळावरच अडवले जाईल, अशी माहिती अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दिली.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT