प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. saam tv
मुंबई/पुणे

Pravin Darekar : महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी मनोज जरांगेंनी सुपारी घेतलीये: प्रवीण दरेकर

Manoj Jarange Patil Vs Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला आहे.

Nandkumar Joshi

संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई

Pravin Darekar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषाने पछाडलेले आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुपारी घेतली आहे, असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील आणि उदयनराजे यांच्याबाबत केलेल्या दाव्यानंतर जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना दरेकर यांनी हा आरोप केला आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

मी जर फुंकलो असतो तरी, उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे पाटील यांनी मला सांगितल्याचा दावा राजेंद्र राऊत यांनी केल्यानंतर त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे यांना फडणवीस यांच्या द्वेषानं पछाडलेलं आहे. आता राजेंद्र राऊत यांच्या मागे पण फडणवीस आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे त्यांचे डोळे तपासण्याची खरंच वेळ आली आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. याच राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंशी संवाद साधून मार्ग काढावा, तसेच जरांगे यांचे मोठेपण सांगताना मी सातत्याने त्यांना पाहिलं आहे, असंही दरेकर म्हणाले.

जरांगेंना जळी-स्थळी फडणवीस दिसत आहेत!

मी म्हणजे सर्वश्रेष्ठ. मी म्हणजे मराठ्यांचा देव आहे, अशा प्रकारे जरांगे वागत आहेत. त्यांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटत आहे. त्यांना जळी- स्थळी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, असंही दरेकर म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुपारी घेतली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राजेंद्र राऊतांवर जरांगेंचा निशाणा, फडणवीसांवरही टीकास्त्र

बार्शी येथील मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचले होते. त्यावेळी जरांगे आणि त्यांच्यात बैठक झाली. यात बोलताना जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे आणि जरांगेंबाबत दावा करणाऱ्या राऊत यांना जरांगेंनी आव्हान दिलं. आधी तुमची भूमिका स्पष्ट करा. मला छेडून राजेंद्र राऊत यांनी आयुष्यातील मोठी चूक केली, असा इशाराच जरांगेंनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकला आहे. राजेंद्र राऊत यांना दोष देऊन काही उपयोग नाही, असंही ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

Maharashtra News Live Update: यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची नागपूर येथे बदली

Kolhapur Tourism: लोणावळा-खंडाळा नक्कीच विसराल! कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे स्वर्गासारखं सुंदर हिल स्टेशन

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT