Prasad Lad News | Mumbai Bank Scam Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bank Scam: मी पळून जाणारा नाही,जशास तसं उत्तर देईन - प्रसाद लाड

लाड यांनी प्रतिक्रिया देत ज्यांनी तक्रार केलीये त्यांनी अभ्यास करावा, असं म्हटलं आहे

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात आपने विधान परिषद सभापती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. प्रसाद लाड यांनी मुंबै बँके प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप आपने केलाय. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपने केलीये. यावर लाड यांनी प्रतिक्रिया देत ज्यांनी तक्रार केलीये त्यांनी अभ्यास करावा, असं म्हटलं आहे (Prasad Lad Reaction On AAPs Letter To Home Minister About Mumbai Bank Scam).

ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी अभ्यास करावा - प्रसाद लाड

"पगारदार वर्गातून आम्ही निवडून येतो. मी व्यावसायिक असलो तरीही कंपनीत मी पगारदारच असतो. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी अभ्यास करावा. मला नोटीस आलेली नाही. नोटीस आली तर मी उत्तर देईल. मी पळून जाणारा नाही,जश्यास तसे उत्तर दिले जाईल", असं प्रसाद लाड (Prasad lad) म्हणाले.

आपची मागणी काय?

प्रसाद लाड हे मुंबै बँकेचे (Mumbai Bank) संचालक आहेत. मुंबै बँकेच्या 2021-2026 या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची मतदार यादीनुसार प्रसाद लाड हे 'क्रिस्टल कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित' या संस्थेतर्फे मतदार आहेत असे नमूद आहे.

प्रसाद लाड हे विधान परिषदेचे आमदार आहेत. व्यवसायाने ते उद्योजक आहेत. पगारदार नोकर नाहीत. गेले कित्येक वर्षे ते मुंबै बँकेत पगारदार नोकरांच्या सहकारी संस्थेतर्फे निवडून जात आहेत. हे अत्यंत गंभीर आणि जनतेची दिशाभूल करणारे आहे, असा आरोप आपकडून करण्यात आला आहे .

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT