Nitin Desai - prasad laad Saam TV
मुंबई/पुणे

Nitin Desai Death Update : नितीन देसाईंना त्रास देणारा बॉलिवूड कलाकार कोण? प्रसाद लाड यांनी केली चौकशीची मागणी

प्रविण वाकचौरे

Update on Nitin Desai Death :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या शेवटच्या ११ ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. पोलीस या सर्व ऑडिओ क्लिपचा तपास करत आहेत. विधीमंडळातही नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी भाजप आमदार प्रसाद यांनी सांगितलं की, बॉलिवूडमधील एका कलाकारामुळे नितीन देसाई यांना काम मिळणे बंद झाल्याचं त्यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं आहे.

नितीन देसाई सातत्याने माझ्या संपर्कात होते. ८-९ महिन्यापूर्वीही ते डिप्रेशनमध्ये होते. मोठं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. मात्र ते कर्ज रिकव्हर करताना ते कशाप्रकारे केलं पाहिजे, याबाबत सरकारची भूमिका देखील जाणून घेतली पाहिजे. रामोजीसारखी एखादी फिल्म सिटी नितीन देसाई यांच्या नावाने इथे उभारण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं. (Latest News Update)

तो कलाकार कोण?

पुढे प्रसाद लाड यांनी म्हटलं की, नितीन देसाई यांच्या मृत्यूआधीच्या ११ ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, एका बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारासोबत झालेल्या भांडणामुळे त्यांना काम मिळत नव्हतं. हा कलाकार कोण होता याची चौकशी झाली पाहिजे.

फिल्म सिटीमधला दहशतवाद थांबला

तसेच फिल्म सिटीमधला दहशतवाद थांबला पाहिजे, याचा देखील सरकारकडून विचार झाला पाहिजे. सरकारने एडलवाईज आणि तो कलाकार कोण याची चौकशी करावी. तसेच एनडी स्टुडिओ सरकारने अधिकृतरित्या त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात द्यावा अशी मी विनंती करतो, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : काल पर्यंत कडू होत...निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉस घरात नेमकं चाललंय काय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT